श्री पद्मावती मंदिराचे बांधकामास सुरुवात
शंकराचार्य न्यासाच्या सोमेश्वर जवळील श्री बालाजी मंदिराच्या आवारात श्री पद्मावती मंदिराचे बांधकामास दि. २८ एप्रिल, २०१८ रोजी उत्साहात सुरुवात झाली. मंदिराच्या स्थापनेपासून धान्यवासात असलेल्या श्री पद्मावती देवीचे सर्वांगसुंदर मंदिर येत्या काही महिन्यांतच तयार होवून तिथे मूर्तीची शास्त्रोक्त प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. शंकराचार्य न्यासाचे विश्वस्त मंडळ व मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत पूजाविधी संपन्न करून कार्यक्रम पार पडला. "२०१९ सालच्या ब्रह्मोत्सवापूर्वी हे बांधकाम पूर्ण करून मंदिर साधकांना खुले करून दिले जाईल असा आम्ही प्रयत्न करीत आहोत," असे याप्रसंगी न्यासाचे अध्यक्ष श्री. आशिष कुलकर्णी यांनी सांगितले.